Ad will apear here
Next
'कलाकारासाठी कौतुकाची थाप महत्त्वाची'
पुणे : ‘कलेच्या प्रांतात प्रयोगशील नाविन्यपूर्ण असे काही करताना रसिकांची मनःपूर्वक दाद मिळाली, कौतुकाची थाप पडली, की आपली वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे याची जाणीव होते. यामुळेच सतत नवीन काही करण्यास बळ मिळतं,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कथक नृत्यगुरू रोशन दात्ये यांनी व्यक्त केले. 

पुण्यातील गानवर्धन संस्थेच्या वतीने देण्यात येणारा नृत्यसाधना पुरस्कार, भरतनाट्यम नृत्यांगना संध्या धर्म यांना देण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. रुपये पाच हजार, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. याप्रसंगी गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी, कार्याध्यक्ष प्रसाद भडसावळे, गानरसिक रमेश बापट, सुप्रिया मसुरकर उपस्थित होते. 

पं हिमांशू नंदा‘गायनाला योग्य व्यासपीठ मिळण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या गानवर्धनसारख्या संस्थांनी नृत्य कलाकारांसाठीही हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्यास पुढाकार घ्यावा,’ अशी अपेक्षा दात्ये यांनी व्यक्त केली. संध्या धर्म म्हणाल्या, ‘कलाकाराच्या दृष्टीने त्याच्या आविष्काराला उपस्थित रसिकांनी दिलेली दाद हा खरा सन्मान असतो. अशा पुरस्कारातून अजून काही चांगले करण्याचे बळ मिळते.’ 

कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य हिमांशू नंदा यांचे बहारदार बासरीवादन झाले. राग ‘पूर्वी कल्याण’ ने सुरु झालेली मैफल संथ आलापीच्या सुरावटींमधून शांतरसमय वातावरण निर्माण करणारी होती. नंदा यांच्या वादनातून उपस्थितांना विशुद्ध व प्रवाही बासरीवादनाची अनुभूती आली. ओंकार दळवी पखवाजवर, पांडुरंग पवार तबला तर क्षितीज सक्सेना यांनी बासरीसाथ केली. कार्यकमाचे सूत्रसंचालन पियांका भडसावळे यांनी केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZCQBF
Similar Posts
‘नृत्य आपल्या जीवनात परिवर्तन घडवते’ पुणे : ‘नृत्य आपल्या जीवनात परिवर्तन घडवते. त्यासाठी मेहनत, साधना खूप असली, तरी आवड असल्याने आपण मेहनत करतो आणि व्यक्तिमत्व बदलून जाते,’ असा सूर आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवातील परिसंवादात उमटला.
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर पुणे : सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हरिश्चंद्रगडचा कोकण कडा, नागफणी, नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरावगड, माहुलीचा बाण, नवरा-नवरी अशा अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाया करणाऱ्या तसेच नाशिक त्रिंबकेश्वर पासून ते आंबोली पर्यंतच्या साह्यवाटा आणि गडकिल्ल्यांच्या यशस्वी मोहीमा राबवून तरुण पिढीला  गिर्यारोहण क्षेत्रामध्ये

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language